डिसेंबरपर्यंत राणीच्याबागेत दाखल होणार ‘पेंग्विन’

rani-baug
मुंबई – भायखळा भागातील महापालिकेच्या जिजामाता उद्यान व प्राणी संग्रहालयात म्हणजेच राणीच्या बागेत येत्या डिसेंबरपर्यंत ‘हॅम्बोल्ट पेंग्विन’ पक्षी आणण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्यासाठी युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पेंग्विनच्या आगमनासाठीच्या पूर्व तयारीची पाहणी केली.

दरम्यान स्थायी समितीने या उद्यानात ६ हॅम्बोल्ट पेंग्विन पक्षी आणण्यासाठी मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी पक्षांसाठी विकसित करण्यात येणाऱ्या सुविधांबाबतचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या वतीने पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना सिंगापूर झुलॉजिकल पार्क आणि बॅंकॉक येथील ‘खाव-ख्याव ओपन झू’ ला पाठविण्यात येणार आहे.

उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. या उद्यानाच्या सुधारीत आराखड्यासाठी केंद्र सरकारची परवानगी प्रस्तावित होती. त्यापैकी मिळालेल्या संमतीनुसार ‘हॅम्बोल्ट पेंग्विन’ पक्षी येत्या डिसेंबरपर्यंत उद्यानात दाखल होणार आहेत. त्यामुळे या पक्षांच्या आगमानापूर्वी महापौर आंबेकर यांच्यासह अदित्य ठाकरे यांनी येथील व्यवस्थेची पाहणी केली. या पक्षांसाठी उद्यानातील नव्याने बांधण्यात आलेल्या एकप्लोरेश सेंटरच्या तळमजल्यावर विशेष पक्षीग्रह तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये पेंग्विनसाठी १०० चौरस मीटर पिंजरा बांधण्यात आला आहे.

Leave a Comment