मुंग्याही करतात टॉयलेटचा वापर

ants
आपल्या नैसर्गिक उर्त्सजर्नासाठी स्वच्छतागृहांचा वापर करावा हे आाजही सुशिक्षित आणि प्रगत माणसांना सांगावे लागत असले तरी निसर्गातील अगदी चिटुकला जीव म्हणजे मुंग्या मात्र त्याबाबत माणसापेक्षाही अधिक सुसंस्कृत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. जर्मनीच्या रेगेन्सबर्ग विद्यापीठातील संशोधक तोमर झोक्झेक्स यांनी या संदर्भात केलेल्या संशोधनात मुंग्या आपल्या घरट्यातील ठराविक कोपरा स्वच्छतागृह म्हणून वापरतात असे आढळले आहे.

मुंग्या याही माणसांप्रमाणेच घनदाट लोकवस्ती करून वसाहतीतून राहणारा प्राणी आहे. त्यांच्यामध्येही माणसांच्या वसाहतीप्रमाणेंच सॅनिटेशनचा मोठा प्रश्न असतो. संशोधक तोमर सांगतात मुंग्यांच्या सॅनिटेशनसंबंधी आत्तापर्यंत फारच थोडे संशोधन झाले आहे. मात्र आम्हाला सततच्या निरीक्षणातून असे आढळले की मुंग्याच्या वारूळांच्या अथवा घरट्यांच्या कुंपणाजवळील भितींवर ठराविक जागीच तपकीरी रंगाचे ठिपके दिसत आहेत. मग आम्ही पांढर्‍या प्लॅस्टरचा वारूळांचा वापर केला आणि मुंग्यांना रंगीत खाद्य पुरविले. तेव्हा प्रत्येक घरट्याचे एक किंवा दोन कोपरे ज्या रंगाचे खाद्य दिले त्या रंगाने भरत असल्याचे दिसून आले. घरट्यात अन्यत्र कुठेही घाण किवा अस्वच्छता आढळली नाही. त्यावरून हे रंगात ठिपके म्हणजे त्यांची स्वच्छतागृहेच आहेत असे अनुमान काढले.

मुंग्यांची वारूळे अथवा घरटी अतिशय स्वच्छ असतात. त्यात कुठेही घाण अथवा मृत मुंग्या दिसत नाहीत. या सर्व कचरा मुंग्या बाहेर आणून टाकतात. मग स्वच्छतागृहातील घाण तशीच का राहात असावी का त्यांचाही त्या कांही उपयोग करतात यावर आता संशोधन केले जात आहे.

Leave a Comment