२९ डिसेंबरला ‘देशभक्त नथुराम गोडसे’चा फैसला

nathuram
पुणे – पुणे नगर न्यायालयाने ‘देशभक्त नथुराम गोडसे’ या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी की नाही, यासाठी न्यायालयीन कक्षा तपासण्याचे ठरवले असून यासंबंधीची सुनावणी येत्या २९ डिसेंबरला होणार असून ही याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेच्या विरोधात असून हा चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

चित्रपट बंदीच्या मागणीसाठी पुणे न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिका केली असून महात्मा गांधी हिंदूविरोधक आणि गोडसे देशभक्त असल्याचे चित्रीकरण चित्रपटात असल्याचे व्यक्तव्य महासभेचे सरचिटणीस मुन्ना कुमार शर्मा यांनी केले असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

याचिकेची सुनावणी घ्यावी की नाही, याबाबत न्यायकक्षा तपासण्यात येणार असल्याचे नगर न्यायाधीश एम. आय. मोडक यांनी सांगितले. त्यानंतरच याचिकाकर्त्यांना आपली बाजू मांडता येणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले.