पाक खेळाडू खेळणार नाहीत `आयपीएल’

khan
कराची – पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी संघ व्यवस्थापनांनी सुरक्षेबाबत कोणतीही जोखीम स्वीकारण्यास नकार दिल्याने पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची कबुली दिली आहे.

खान म्हणाले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिका-यांनी स्पष्टपणे सांगितले की, या स्पर्धेत २००९ पासून पाकिस्तानी खेळाडू न खेळण्यामागे त्यांची कोणतीही भूमिका नाही. आयपीएलमधील संघ देखील शाहिद आफ्रिदीसारख्या लोकप्रिय खेळाडूला करारबद्ध करू इच्छितात. मात्र, सुरक्षेची चिंता सतावत असल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल संघात निवडण्यास संघ व्यवस्थापन प्राधान्य देत नाही.
या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंना खेळवू नये अशा मताचे भारतातील बहुतांशी प्रेक्षक असल्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेबाबत त्यांना चिंता वाटत असल्याचे यावेळी शहरयार यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी हॉकी आणि कबड्डीच्या मैदानात पाकिस्तान व भारत यांच्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाबद्दल विचारले असता खान म्हणाले की, पाकिस्तान आणि भारतीय क्रिकेट मंडळाचे संबंध नेहमीच अत्यंत सलोख्याचे राहिले आहेत.

Leave a Comment