
कराची – पेशावर येथील आर्मी शाळेवर झालेल्या हल्ल्याचा शोक म्हणून यंदा कराचीत नवीन वर्ष साजरे करण्याच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी लागू करण्यात आली आहे. पूर्वी ठरलेले सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले असल्याचे आयुक्त शोएब सिद्दीकी यांनी सांगितले.
कराचीत नवीन वर्ष सेलिब्रेशनवर बंदी
सिद्दीकी म्हणाले की १६ डिसेंबरला पेशावर येथील आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विद्यार्थ्यांसह १५० जणांचा जीव गेला आहे. सर्व देश सध्या शोकसागरात बुडालेला आहेच पण देशातील सुरक्षा परिस्थिती पाहता नवीन वर्षाचा सण साजरा करावा अशी परिस्थिती नाही. त्यामुळे हॉटेल्स अथवा अन्य ठिकाणीही फटाके उडविणे आणि मेजवान्या आयोजित करण्यास परवानगी दिली गेलेली नाही.
