
मसुरी – नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सहपरिवार मसुरीला पोहोचलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यंदाच्या थंडीने चांगलाच गारठला आहे. यावर्षी संपूर्ण उत्तरांचल मध्ये थंडीची लाट आहे आणि त्याचमुळे मसुरीतही प्रचंड थंडी आहे. सचिनने आपल्या ब्लॉगवर या थंडीचे वर्णन केले असून ही थंडी अक्षरशः हाडे फोडणारी असल्याचे म्हटले आहे. थंडी इतकी प्रचंड आहे की घराबाहेर पडणे शक्यच नाही असे सांगताना थंडी पळविण्यासाठी मुलगा अर्जुन याच्याबरोबर टेनिस खेळलो असेही सचिन म्हणतो.
मसुरीतील थंडीने सचिन गारठला
सचिन त्याचा मित्र नारंग याच्या घरीच मुक्कामास आहे. मात्र मसुरीचे तापमान जवळजवळ शून्य डिग्रीवर असल्याने बाहेर फिरणे अशक्य बनले आहे. मंगळवारी सायंकाळी सचिनने त्याच्या फेव्हरीट चार दुकानात मॅगी खाण्याचा पायंडा पाळला मात्र त्यानंतर तो घराबाहेर पडलेला नाही. सचिनचे एखादे दर्शन होईल या आशेने प्रचंड थंडीतही घराबाहेर जमलेल्या गर्दीची मात्र त्यामुळे कांहीशी निराशा झाली आहे.
