
एलजी ने मोझिला बरोबरच्या सहकार्यात जपानमध्ये आपला पहिला पारदर्शी स्मार्टफोन लाँच केला असून त्याची विक्री सुरू झाली आहे. हा पहिला फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा स्मार्टफोन २६३०० रूपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनची फ्रंट, बॅक व साईड पॅनल पारदर्शक आहेत.
एलजीचा पारदर्शी एफएक्सओ स्मार्टफोन सादर
या स्मार्टफोनसाठी ४.७ इंची डिस्प्ले, १६ जीबीची इंटरनल मेमरी, ती कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविता येण्याची सुविधा, एलइडी फ्लॅश, ८ एमपीचा रियर व २.१ एमपीचा फ्रंट कॅमेरा व फोरजी, एलटीई, एनएफसी सपोर्ट त्याला देण्यात आला आहे.
