वॉर्सातील व्हीलानोव्ह पॅलेस नाताळसाठी सजला

vilanova
वार्सा – पोलंडची राजधानी वार्सा येथील व्हिलानोव्ह पॅलेस नाताळसाठी सजला असून येथे अत्यंत आकर्षक रोषणाई केली गेली आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी दूर दूरच्या ठिकाणाहून पर्यटक येथे आत्तापासूनच गर्दी करू लागले आहेत.

सतराव्या शतकात किंग जॉन तिसरा सोबेस्की याने हा महाल बांधला आणि त्याच्यानंतर राज्यावर आलेल्या अनेक राजांनी त्या बांधकामात भर घातली. हा पॅलेस त्याच्या आकर्षक बांधकामासाठी संपूर्ण युरोपात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे पहिल्या व दुसर्‍या जागतिक महायुद्धात आणि पोलंडच्या फाळणीतही हा पॅलेस टिकून राहिला आणि आज तो पोलंडचा एतिहासिक वारसा म्हणून ओळखला जातो. महत्त्वपूर्ण एतिहासिक इमारतीतील हा मुख्य राजवाडा २००६ साली इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ युरोपियन रॉयल रेसिडेन्सचा सदस्य बनला आहे.
warsa

या राजवाड्याबरोबरच पोलंडमधील अन्य इमारती व चर्चेसही नाताळसाठी सजली असून येथील बाजारपेठही नाताळ खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.