ह्युंदाईची नवीन अवतारातील इलेंट्रा भारतात येणार

elentra
कोरियन कार उत्पादन कंपनी ह्युंदाईने त्यांची अव्हेंटा नवीन अवतारात सादर करण्याची तयारी सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ही सेदान कार भारतात इलेंट्रा नावाने लोकप्रिय झाली होती आणि याच नावाने तिची भारतात विक्री केली जात होती. आता ही कार नवीन अवतारात नेक्स्ट जनरेशन व्हर्जन म्हणून बाजारात उतरविली जाणार आहे. कोरियातील कंपनीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत हे नवे व्हर्जन कोरियात २१०५ सालात तर भारतात २०१६ सालात सादर करण्यात येणार आहे.

नवीन नेक्स्ट जनरेशन व्हर्जन तुसान एसयूव्हीचेच मॉडिफिकेशन आहे मात्र ते यापूर्वी भारतात उपलब्ध नव्हते. भारतासह कांही देशात ही कार इलेंट्रा नावाने विकली जात होती. नवीन व्हर्जनमध्ये त्यांच्या अंतर्गत सजावटीत अनेक बदल केले गेले आहेत तसेच डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये ती उपलब्ध होणार आहे. या कारला अॅटोमॅटिक तसेच मॅन्युअल गिअर बॉक्स दिले जाणार आहे. ही गाडी करोला, व्हीडब्ल्यू जेट्टा, स्कोडा, ऑक्टाव्हीया आणि रेनॉल्डच्या फ्यूएन्सबरोबर स्पर्धा करेल आणि तिची किंमत १५ ते २० लाखांदरम्यान असेल असे समजते.

Leave a Comment