वॉलमार्टची आग्रा येथे दुसरी शाखा

wall
भारतीय बाजारात अनेक अडचणींचा सामना करावा लागलेल्या वॉलमार्टने दोन वर्षांच्या गॅपनंतर आग्रा येथे आपले दुसरे स्टोअर उघडण्याची तयारी सुरू केली आहे. भारतातील मल्टीब्रांड रिटेल व एफडीआय या मुद्द्यांवरून तसेच या संदर्भातली नियमावली स्पष्ट न झाल्याने वॉल मार्ट इंडियाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले व परिणामी त्यांनी कॅश अॅन्ड कॅरी पद्धतीने ठोक बाजारावर आपले लक्ष केंद्रीत केले होते.

आग्रा येथे आपले दुसरे ठोक स्टोअर सुरू करून वॉलमार्ट पुन्हा मोठा डाव खेळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या स्टोअर्ससाठी प्राथमिक परवानग्यांचे काम झाले आहे मात्र अंतिम परवान्यासाठी वाट पाहिली जात आहे असे वॉलमार्ट इंडियाच्या अधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे. असे स्टोअर्स दोन वर्षापूर्वी भोपाळ येथे सुरू करण्यात आले आहे. आग्रा येथे पूर्वीच सुरू करण्यात आलेले स्टोअर्स फ्रेंच रिटेल कंपनीकडून चालविले जात आहे मात्र ही कंपनी भारतातून बाहेर पडत असल्याने ते स्टोअर्स वॉलमार्टच्याच ताब्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. कंपनी भारतात अशी ५० स्टोअर्स सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.

कंपनीने बेस्ट प्राईज नावाने भारताच्या ९ राज्यात २० कॅश अॅन्ड कॅरी स्टोअर्स सुरू केली असून येथे छोट्या दुकानदारांना ठोक रकमेत माल विकला जातो. आग्रा येथील दुसरे स्टोअर जूनपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. जानेवारीत वॉलमार्टचे प्रेसिडेंट डेव्हीड चोसवर्थ भारतात येत असून त्याचवेळी भारतातील कंपनीच्या गुंतवणुकीसंबंधी आणि या स्टोअर संबंधी घोषणा केली जाईल असे समजते.

Leave a Comment