
सौदी अरेबिया – एका लहान मुलाचे अपहरण करून, त्याला बांधून ठेवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सौदीत सुलेमान बिन अब्दुल्ला याचे डोके उडविले गेल्याचे वृत्त आहे. बुरायदाह शहरात या शिक्षेची अम्मलबजावणी केली गेली असल्याचे समजते. सौदीत या वर्षात ८४ जणांना मृत्युदंडाची शिक्षा दिली गेल्याचे आकडेवारी सांगते.
लहान मुलावर लैंगिक अत्याचार- सौदीत एकाचे डोके उडविले
सौदीत शरीया कायदा पाळला जातो. या कायद्यानुसार बलात्कार, हत्या, अमली पदार्थ तस्करी, धर्मत्याग आणि सशस्त्र दरोडे यासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. अॅमनेस्टी इंटरनॅशनलच्या आकडेवारीनुसार इराण व इराकनंतर २०१४ सालात सौदीत सर्वात जास्त मृत्युदंडाच्या शिक्षा दिल्या गेल्या आहेत.
