विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडेची वर्णी

munde
मुंबई : आज विधानपरिषदचे सभापती शिवाजी देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील यावेळी सभागृहात उपस्थित होते.

राष्ट्रवादीने आधीच मुंडे यांचे नाव विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी जाहीर केले होते. मात्र, या मुद्दय़ावर काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये ताणाताणी निर्माण झाली होती. अखेर मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. धनंजय मुंडे हे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. मात्र, काकांशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला होता. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर पाठविले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंडे यांना परळीतून तिकीट देण्यात आले होते. मात्र, बहीण पंकजा मुंडे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

पंकजा यांना शह देण्यासाठी तसेच ओबीसी समाजाला चुचकारण्यासाठीच धनंजय यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment