स्पेनच्या राजकुमारीवर अफरातफरीचा खटला चालणार

kristina
स्पेनची राजकुमारी ख्रिस्टीना हिच्यावर पतीच्या व्यवसाय व्यवहाराबद्दल खोटी माहिती देऊन करचुकवेगिरी केल्याप्रकरणात आणि पैशांची अफरातफरी केल्याप्रकरणात न्यायालयात खटला चालविला जाणार आहे. राजघराण्यातील कोणा व्यक्तीविरोधात असा खटला चालविण्याची स्पेनच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजकुमारी ख्रिस्टीना आणि तिचा पती उन्द्रान्गारीन व त्याचा भागीदार यांनी सार्वजनिक निधीतील लाखो युरोची अफरातफर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २००७-०८ सालात उर्दान्गारीन व त्याचा भागीदार डिएगो टोरेस यांनी वेलेन्शियात स्थानिक सरकारी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठी रक्कम जमविण्याच्या नादात नूस इन्स्टिट्यूट या क्रीडा संस्थानाचा वापर केला आणि त्यातून ५६ लाख युरोंची अफरातफर केली असल्याचे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले गेले आहे. राजकुमारी ख्रिस्टीना हिने त्यातीलच २६ लाख युरोंची अफरातफर केल्याचा आरोपही केला गेला आहे.

ख्रिस्टीना ही राजपरिवारातील सर्वात धाकटी मुलगी आहे.

Leave a Comment