
भुवनेश्वर- चँपियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत यजमान भारताला पाकिस्तानने ४-३ असे निसटत्या फरकाने हरवत फेरीत धडक मारली. काल झालेली उपांत्य फेरीची लढत चांगलीच रंगली. मात्र खेळ संपायला एक मिनिट असताना कादिर मोहम्मद अर्सलनने केलेला गोल निर्णायक ठरला. अंतिम फेरीत पाकिस्तानसमोर जर्मनीचे आव्हान आहे. कादिरने एकूण दोन गोल केले.
पाकिस्तानची भारतावर सरशी
तत्पूर्वी, गुरबज सिंगने १४व्या मिनिटाला भारताचे खाते खोलले. पहिल्या क्वार्टरमध्ये १-० अशी आघाडी भारताकडे असली तरी दुस-या क्वार्टरमध्ये दुस-याच मिनिटाला कादिर मोहम्मद अर्सलनने पाकिस्तानला बरोबरी साधून दिली. दुसरा क्वार्टर संपला तेव्हा १-१ अशी बरोबरी राहिली.
तिस-या क्वार्टरमध्ये ३२व्या मिनिटाला वकास मोहम्मदने पाकिस्तानला आघाडी मिळवून दिली. मात्र ३८व्या मिनिटाला थिमैया चंदंदाने केलेल्या गोलने भारताला २-२ अशी बरोबरी साधता आली. ४०व्या मिनिटाला तौसिफ मांहम्मद आणि ४३व्या मिनिटाला सरदार सिंगने गोल केल्या तिस-या क्वार्टरनंतर ३-३ अशी बरोबरी होती.
