एसीबीकडे सोपवले भुजबळांच्या बेहिशेबी संपत्तीची कागदपत्रे

kirit-somaiyya
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भाजपचे खासदार किरीट सोमया यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या विरोधात काही कागदपत्रे दिले आणि त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी छगन भुजबळ यांची बेनामी संपत्ती असून सिंगापूरमध्ये भूजबळ यांच्या बेनामी कंपन्यांचे बॅंक अकाऊंट आहेत. तर इण्डोनेशियामध्येही दोन कोळसा खाणी असल्याचा आरोप किरीट सोमया यांनी केला आहे. या कोळशाच्या खाणी भुजबळांनी अनिल वस्तावडे या एजंटमार्फत घेतल्या होत्या असेही सोमय्यांचे म्हणणे आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांना कोळसा खाणी अनिल वस्तावडे याने घेऊन दिल्या होत्या. अनिल वस्तावडे आणि मधु कोडा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी अटकही झाली होती. अशी सर्व माहिती किरीट सोमया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली आहे.

Leave a Comment