मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला एप्रिलचा मुहूर्त

highway
रत्नागिरी – केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन वर्षाच्या एप्रिल महिन्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील १४ पुलांची कामे सुरू होतील. तसेच भूसंपादनाचे काम गतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ८० टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एप्रिलअखेर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

या महामार्गाचे एकूण चार टप्प्यांत काम केले जाणार असून संपूर्ण रस्ता चौपदरी व सिमेंट काँक्रीटचा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन वर्षात कोणत्याही परिस्थितीत या रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षात घेता लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण कसे होईल, असा प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम चार टप्प्यांत केले जाणार आहे. इंदापूर ते कशेडी, कशेडी ते संगमेश्वर, संगमेश्वर ते राजापूर आणि राजापूर ते झाराप असे हे चार टप्पे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांना भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment