
नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या पावडरचे दर कमी झाल्यामुळे दुधाच्या दरातही लिटरमागे ५ ते ६ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीची बैठक बोलविली जाईल. तसेच दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे एका लक्षवेधीवर उत्तर देताना सांगितले.
दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी प्रयत्न करणार: फडणवीस
दुधाच्या पावडरचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात घटल्यामुळे दूध पावडर उत्पादकांनी दुधाची कमी दराने सुरू केलेली खरेदी, ऑक्टोबर २०१४मध्ये दुधाच्या लिटरमागे ५ ते ६ रुपयांनी घट झाल्याने दुधाच्या दरात घट झाल्यामुळे दूध उत्पादक चिंताग्रस्त आहेत. याबाबत सरकार दुग्ध शेतक-यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याची लक्षवेधी गणपतराव गायकवाड आणि बाबुराव पाचर्णे यांनी उपस्थित केली.
