रिक्षा संघटनेचा दावा; शहरात ३० हजार रिक्षा अनधिकृत

autorikshaw
मुंबई – टूरिस्ट टॅक्सीच्या नावाखाली नियमित सेवा देणा-या खासगी टॅक्सी कंपन्याप्रमाणेच शहरात सुमारे ३० हजार अनधिकृत रिक्षा सुरू असल्याचे दावा रिक्षा संघटनेकडून करण्यात आला. नोंदणी रद्द झालेल्या, बॅज, लायसन्स नसणार्या् रिक्षा अनधिकृपणे चालवण्यात येत असल्याने त्यावर कारवाई करावी, अशी मागणी ’मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन’ने केली आहे. उपनगरांत वांद्रे, सांताक्रूझ, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, मालवणी, कांदिवली, बोरीवली, दहिसर, गोवंडी, चेंबूर, कुर्ला-वांद्रे टर्मिनस, सायन आदी भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रिक्षा चालवण्यात येत असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. या रिक्षा परिवहन आणि वाहतूक पोलिस अधिकारी- कर्मचार्यांलच्या संगनमताने सुरू असल्याचा आरोप युनियनचे सरचिटणीस शंकर साळवी यांनी केला आहे. मुंबईत एकूण १ लाख ४ हजार रिक्षा अधिकृत असून त्यापैकी २० हजार रिक्षांच्या परमिटचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर ८५ हजार रिक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment