आज राज्यातील ६० हजार शाळा बंद

school
मुंबई – शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ४८ हजार शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याचा निर्णय आणि विनाअनुदानित शाळांना अनुदान न देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिल्याने राज्यातील ६० हजार शाळांचा एकदिवसीय शाळा बंदचा निर्णय कायम ठेवल्याची माहिती शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्यातील शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी तसेच शिक्षणमंत्री यांच्या बैठकीत शाळा बंद होऊ नये व सन्मान्य तोडगा निघावा यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींनी केला. याबाबत आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन यापूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र आजच्या बैठकीत त्यांनी बेदरकार भाषा वापरल्याचे सांगून दोन्ही महत्त्वाच्या मागण्या त्यांनी फेटाळून लावल्या. त्यामुळे राज्यातील 48 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असून त्यांना टप्प्याटप्प्याने सेवेतून काढून टाकण्याचे षड्यंत्र सरकारचे असल्याचा आरोप आमदार कपिल पाटील यांनी केला. त्यामुळे आज शाळा बंद होणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment