मुंबईच्या ओव्हलवर यष्टीरक्षकाचा मृत्यू

cricket
मुंबई : क्रिकेट विश्व ऑस्ट्रेलियाच्या फिल हयूग्सच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत नाही तोच आणखी एका क्रिकेटपटूचा क्रिकेटच्या मैदानात दुदैवी मृत्यू झाला असून रत्नाकर मोरे या यष्टीरक्षकाचे ह्य्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईच्या ओव्हल मैदानात सामना सुरू असताना निधन झाले.

टाटा पॉवर संघाचा रत्नाकर मोरे हा यष्टीरक्षक असून मुंबईच्या ओव्हल मैदानात सुरू असलेल्या टाटा स्मोर्टस क्लबच्या इंटर डिपार्टमेंटल स्पर्धेत तो खेळत होते. सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोरेला अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी ह्य्दयविकाराचा झटका आल्याने मोरे खाली कोसळला. त्याला तातडीने बॉम्बे हॉस्पिटल आणि नंतर जीटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, मोरे याचा अवघ्या तिसाव्या वर्षी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.