हिंदुहृदयसम्राट यांच्या स्मारकासाठी समिती गठीत

balasaheb
मुंबई : आता भाजपाने दिवगंत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी पुढाकार घेतला असून राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेबांच्या कतृत्वाला साजेसे स्मारक उभारण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

मुंबईत बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दोन वर्ष झाली तरी स्मारकाच्या कामाला सुरूवात झाली नव्हती. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाले आणि भाजपाचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली होती. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. दरम्यान, शिवसेनाही सत्तेत सहभागी झाली.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य सरकारच्यावतीने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून, या समितीत वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱयांचा समावेश करण्यात आला आहे. स्मारकासाठी दक्षिण मुंबई किंवा वांद्रे परिसरात जागा शोधण्यात येत आहे. लवकरच स्मारकाचे स्वरूप आणि जागा निश्चित केली जाणार आहे.

Leave a Comment