
भुवनेश्वर – भारताने जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या हॉलंडचा चँपियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतील ‘ग्रुप बी’मधील गटवार साखळी सामन्यात ३-२ने पराभव करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केल्यामुळे गटात भारत तिस-या स्थानावर पोहचला आहे.
चँपियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताची हॉलंडवर मात
विश्वचषक विजेते आणि ऑलिंपिकमधील रौप्य पदक विजेत्या हॉलंड संघाला भारतीय संघाने ३-२ असा धक्का दिला. या आधी भारतने ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी झालेल्या लढतीत हॉलंडवर बार्सिलोना येथे १९९६मध्ये विजय मिळवला होता.
गटवार साखळी सामन्यात हॉलंडने दोन विजय मिळवले होते. तर या उलट पहिल्या दोन्ही सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यामुळेच हा सामना भारतासाठी अवघड असाच होता.
