अ‍ॅक्सिस बँकेची गृहकर्जासाठी स्थिर दराची ऑफर

axis
मुंबई – ५० लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर वीस वर्षासाठी १०.४० टक्के स्थिर दराची ऑफर खासगी क्षेत्रातील तिसरी मोठी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने दिली असून बँकेच्या आधारभूत दरापेक्षा पाव टक्का जादा हा दर असून मर्यादित कालावधीची ही योजना परवडणा-या घरांसाठी असल्याचे बँकेने म्हटले आहे.

अ‍ॅक्सिस बँकेचे किरकोळ कर्ज विभागाचे अध्यक्ष जयराम श्रीधरन यांनी संस्था म्हणून व्याजदराची जोखीम स्वीकारावी किंवा त्याचा भार ग्राहकांवर टाकावा हा सर्वस्वी संस्थेचा प्रश्न आहे. मात्र आम्ही ग्राहकांच्या पसंतीला झुकते माप देण्याचे ठरवल्याचे सांगितले.

ग्राहकांना यामध्ये स्थिरवरून बदलत्या कर्जदर योजनेतही प्रवेश करता येणार आहे. मात्र यासाठी शिल्लक कर्ज रकमेवर २ टक्के शुल्क भरावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दशकभरात व्याजदरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. भविष्यातही याबाबत अंदाज बांधणे शक्य नसल्याचे श्रीधरन यांनी सांगितले.

Leave a Comment