जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत संग्राम चौघुलेला सुवर्णपदक

sangarm
मुंबई – महाराष्ट्राच्या संग्राम चौघुलेने जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत ८५ किलो वजनी गटात आपल्या पिळदार शरीरयष्टीने पंचांसह उपस्थित हजारो प्रेक्षकांची मने जिंकून घेत सुवर्णपदक पटकावले.

बी.महेश्वरन याने. ७० किलो वजनी गटात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले . महाराष्ट्राच्या या दोन्ही शरीरसौष्ठवपटूंच्या कामगिरीच्या जोरावर भारताला पुरुष सांघिक गटात उपविजेतेपद मिळाले. थायलंडने पुरुष आणि महिला दोन्ही गटात सांघिक विजेतेपद मिळवले.

स्पर्धेतील प्रतिष्ठेचा मिस्टर युनिव्हर्स किताब हंगेरीच्या पीटर मुलनारने पटकावला. इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन (आयबीबीएफ)ने गोरेगाव येथे सहाव्या जागतिक शरीरसौष्ठव आणि फिजिक स्पोटर्स स्पर्धेचे आयोजन केले होते.

Leave a Comment