‘टाइम पर्सन ऑफ द इयर’च्या शर्यतीतून नरेंद्र मोदी आउट

modi
न्यूयॉर्क : ‘टाइम’ मासिकाच्या ‘टाइम पर्सन ऑद इयर’ किताबासाठी निवडलेल्या अंतिम आठ उमेदवारांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागा मिळवू शकले नाहीत. मात्र रीडर्स पोलमध्ये नरेंद्र मोदी हे ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ ठरले आहेत.

अंतिम आठ जणांची यादी ‘टाइम’ संपादकांच्या पॅनलने जारी केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव नसल्यामुळे आता या आठपैकीच एक जण ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ बनणार आहे. याची घोषणा बुधवारी होणार आहे. यापूर्वी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १९३० मध्ये हा सन्मान मिळाला होता आणि ते पहिले भारतीय ठरले होते.

अलीबाबा समूहाचे प्रमुख जैक मा, इबोला केअरगिव्हर्स (आफ्रिकेत इबोलाविरुद्ध लढणारे), रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, अॅपलचे सीईओ टीम कुक, फग्युर्सनचे आंदोलक, गायिका टेलर स्विफ्ट, नॅशनल फुटबॉल लीगचे आयुक्त रॉजर स्टोक गुडेल आणि कुर्दिश नेते सूद बरझानी यांचा अंतिम आठ जणांमध्ये समावेश आहे.