महिला मंडळाची गाऊनवर बंदी

maxi
मुंबई : नवी मुंबईतल्या गोठावली गावातल्या इंद्रायणी महिला मंडळाने महिलांवर आता नवे बंधन घातले असून त्याच्यानुसार आता महिलांना रस्त्यावर फिरताना मॅक्सी अर्थात गाऊन घालता येणार नाही. तसा आदेशच गावाच्या फलकावर लिहिला गेला आहे आणि जी महिला याचे उल्लंघन करेल तिला थेट आर्थिक दंडांचे फर्मान देखील या महिला मंडळाने काढला आहे.

बदललेल्या वेशभूषेमुळे बलात्काराच्या घटना वाढल्याचे संशोधन गोठीवली गावातल्या या महिला मंडळाच्या बैठकीत करण्यात आले. याच कारणामुळे देशभरात बलात्काराच्या घटना वाढल्याचे इंद्रायणी महिला मंडळाचे म्हणणे असल्यामुळे गावातील महिलांनी मॅक्सी अर्थात गावून रस्त्यावर फिरू नये अशा अजब फतवाच इंद्रायणी महिला मंडळाने काढला आहे. अशा वेशभुषेमुळे पुरुष वर्ग आकर्षित होत असल्याचा शोध लावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मंडळाचा आदेश मोडणाऱ्या महिलेला तब्बल ५०० रुपयांचा दंडही ठोठावण्याचा आदेशही मंडळाने काढला असून मंडळाच्या सदस्य महिला या साऱ्या प्रकारांवर लक्ष ठेवणार आहेत आणि नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करतील. तशा आशयाचा फतवाच गावातील फलकावर लिहिण्यात आला आहे.

Leave a Comment