काँग्रेसच्या शेतकरी मोर्चाचा बट्याबोळ

congress
नागपूर – काँग्रेसचा दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी हल्लाबोल मोर्चा विधानभवनावर धडकला. या मोर्चाला शेतक-यांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने मोर्चाचा बट्याबोळ झाला. १५ वर्षे सत्तेत असणा-या काँगेस नेते या मोर्चामुळे तोंडघशी पडले आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना कर्जमाफी, आर्थिक सहाय्य देण्यात यावे, या मुद्द्यावर शिवसेना-भाजप युतीच्या सरकारला घेरण्यासाठी शेतक-यांच्या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे गटनेते, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमीवरून निघणार होता. परंतु, एकही शेतकरी दीक्षाभूमीवर न आल्यामुळे काँग्रेस नेत्यांची फजिती झाली. आता काय करायचे? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला. शेवटी विधानभवनातील काँग्रेसच्या कार्यालयातून माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांनी मोर्चा काढून सरकारचा निषेधाच्या घोषणा देत विधानभवनाच्या पाय-यांवर १० मिनिटे आंदोलन केले.

Leave a Comment