
नाशिक – लातूरमधील एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचा फुटलेल्या पेपरची परीक्षा नव्याने म्हणजेच पाच डिसेंबरला घेतली जाणार आहे.
नव्याने होणार फुटलेल्या पेपरची परीक्षा
आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे एमबीबीएसच्या तिस-या वर्षातील विद्यार्थ्यांचा २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘ईएनटी’ विषयाचा पेपर होणार होता. मात्र त्यापूर्वीच एका सोशल साइटच्या माध्यमातून हा पेपर परीक्षार्थीपर्यंत पोहोचला. हा पेपर फुटल्याचे अनेक ठिकाणी परीक्षा झाल्यानंतरच लक्षात आले.
पंचवटी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अवसारे यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती या प्रकरणानंतर कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ, परीक्षा नियंत्रक डॉ. के. डी. चव्हाण, उपकुलसचिव नितीन कावेडे, विधी अधिकारी संदीप कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी दिली होती.
