औषधांच्या उपलब्धतेमुळे एड्सचे व्यवस्थापन शक्य – डॉ. द्रविड

aids
पुणे – एकेकाळी जीवघेणा आणि असाध्य एड्स हा रोग आता दीर्घकालीन व्यवस्थापन करण्यायोग्य झाला असून नियमित उपचाराने एचआयव्हीग्रस्त ६० ते ७० वर्षांपर्यंत आयुष्य जगू शकतो अशी ग्वाही एचआयव्ही उपचारतज्ञ डॉ. अमित द्रविड यांनी दिली.

जागतिक एड्सदिनाच्या निमित्ताने सिप्ला फौंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात आतापर्यंत २१ लाख एड्सग्रस्त रुग्ण आढळलेले असून हे प्रमाण संभाव्य रुग्णांच्या केवळ ५० टक्के आहे. यापैकी निम्म्या रुग्णांना आपण एड्सग्रस्त असल्याची माहिती नाही असा उल्लेख डॉ. द्रविड यांनी केला. १९९५मध्ये एचआयव्हीवर उपचारासाठी झिडोयुदिन या पहिल्या औषधाचा शोध लागला. त्यानंतर आतापर्यंत २८ नवीन औषधे एड्सवरील उपचारासाठी विकसित करण्यात आली आहेत. औषधांची उपलब्धता आणि जनजागृती यामुळे नव्याने एचआयव्हीबाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या ५७ टक्क्यांनी कमी झाली आहे.

सन २०२५ पर्यंत भारताला एड्समुक्त करण्याचा भारत सरकारचा संकल्प असून वैद्यकीय तज्ञ, स्वयंसेवी संस्था यांचा या प्रयत्नांना सक्रीय पाठींबा आहे असा दावा डॉ. द्रविड यांनी केला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment