शिवसेनेला ४ मंत्रिपदांची दिली भाजपने ऑफर

yuti
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिल्यानंतर, भाजपने शिवसेनेला चार मंत्रिपदांची ऑफर देऊ केली आहे. यामध्ये उर्जा, जलसंपदा, उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय राहणार असल्याचे स्पष्ट केले असून मात्र शिवसेना पाच कॅबिनेट मंत्रिपदे आणि आठ राज्यमंत्रिपदांवर अडून बसली आहे. मात्र भाजप चार मंत्रिपदे देण्यास तयार असल्यामुळे फक्त गृहमंत्रिपदावरुनच शिवसेना-भाजपमध्ये चर्चेची गाडी अडल्याची चर्चा आहे.

दरम्यान फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार ३ किंवा ४ डिसेंबरला होण्याची शक्यता असल्यामुळे भाजपची ऑफर स्वीकारुन शिवसेना सत्तेत सहभागी होणार की विरोधी पक्षातच कायम राहणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Comment