
नवी दिल्ली – क्रिकेट जगताचा विक्रमादित्य म्हणून प्रसिद्ध असलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरचे महागड्या आणि लक्झरी गाड्यांबद्दलचे प्रेम जगजाहीर आहे. क्रिकेटला बायबाय केलेल्या खासदार झालेला सचिन आपल्या फावल्या वेळेत आपली ही हौस पूर्ण करतो.
महागड्या गाड्यांचा मुरीद आहे मास्टरब्लास्टर
सध्या सचिन संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीत असून परंतु येथे देखील तो आपले हे प्रेम लपवू शकला नाही आणि तो ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल येथे जर्मनीची लग्झरी कार निर्माती करणारी बीएमडब्ल्यूच्या दोन नव्या गाड्या लाँच करण्यासाठी पोहचला.
सचिन स्वत: अशा प्रकारच्या लग्झरी गाड्यांचा मालक आहे. तर काही वर्षांपूर्वी फॉर्मूला वनचा बादशहा मायकल शुमाकर याने सचिनला फेरारी कार भेट म्हणून दिली होती. या कारमुळे सचिन खूप उत्साहित होते. एवढेच नाहीतर सचिन रात्री उशिरा ही गाडी घेऊन मुंबई फिरण्यासाठी निघून जात असे.
