
मुंबई – जवखेडा दलित हत्याकाडांची चर्चा देशासह राज्यभरात होत असून थेट पोलिसांवरच या हत्याकांडातील पीडित जाधव परिवाराने गंभीर आरोप केला आहे. हे हत्याकांड घरातल्याच एका व्यक्तीने केले असे सांगा आणि एक लाख रुपये घ्या अशी ऑफर पोलिसांनी दिल्याचा गंभीर आरोप, मयत संजय जाधव यांचे मोठे बंधू दिलीप जाधव यांनी केला आहे.
पैसे घ्या आणि गुन्हा कबुल करा, जाधव परिवाराला पोलिसांची ऑफर?
जाधव कुटुंबियांना याप्रकरणी पोलिसच धमकावत असल्याचा आरोप, त्यांनी केल्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.
