वीणा मलिकला २६ वर्षे कैदेची शिक्षा

veena-malik
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक, तिचे पती बशीर आणि पाकिस्तानातील मिडीया समूह जिओ टिव्ही आणि जंग समूहाचे मालक शकील-उर-रहमान यांना २६ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

जिओ टिव्हीवर मे महिन्याच्या दरम्यान एक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला होता. याकार्यक्रमात धार्मिक गीत वाजवण्यात आले होते. वीणा मलिक आणि तिचे पती बशीर या दोघांनी यामध्ये काम केले होते. या कार्यक्रमामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला होता.

या प्रकरणी वीणा मलिक, तिचे पती बशीर, शकील-उर-रहमान यांच्यासह कार्यक्रमाचा सूत्रसंचालक शैष्टा वाहिदी यांना न्यायमूर्ती शाहबाझ खान यांनी २६ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच १३ लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तसेच या सर्व दोषींना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, शिक्षा सुनावण्यात आलेले हे सर्व दोषी पाकिस्तानबाहेर आहेत.

Leave a Comment