
मुंबई – सांताक्रुझ येथील पोस्ट ऑफिसमधून शिवसैनिकांनी एकनाथ खडसे यांना एक मोबाईल भेट म्हणून पाठविला आला आहे. हा मोबाईल खडसेंना लवकरच पोस्टाने मिळणार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसेंना शिवसैनिकांकडून मोबाईल गिफ्ट
खडसेंनी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केल्यावरून हा मोबाईल जितेंद्र जनावळे या शिवसैनिकाने पाठवला आहे. एकनाथ खडसे यांनी काल शेतकऱ्यांना मोबाईल बिल भरायला पैसे आहेत, मग वीजेचं बिल का भरत नाहीत? असा सवाल केला. त्यावर राज्यभरातून कडव्या प्रतिक्रिया येत असून आणि यावर शिवसेना अधिक आक्रमक झालेली आहे.
