शिवसेनेने पाठींबा दिल्यास सुंठीवाचून खोकला जाईल – शरद पवार

sharad-pawar
सातारा – शिवसेनेने भाजपला सत्ता स्थापनेत पाठिंबा दिला तर सुंठीवाचून खोकला गेला, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सेना-भाजपमधील तिढ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

भाजप आणि शिवसेनेत महाराष्ट्रात सत्तेत एकत्र येण्यावरुन अद्यापही तिढा कायम असून मात्र दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच गु-हाळ अजूनही सुरुच आहे. याबाबत त्यांना विचारले असता शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून आम्ही भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला आहे. मात्र सत्तेत एकत्र यायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. असे ते म्हणाले. दरम्यान यावेळी पवार यांनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावरही टीका केली. ऊसदराबाबत आंदोलन करणारेच आता सत्तेत आहे या शब्दात त्यांनी शेट्टींवर टीका केली.

Leave a Comment