
नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती देत असतानाच युतीसंदर्भात शिवसेनेसोबत चर्चेसाठी दरवाजे खुले असल्याचे सांगितले.
शिवसेनेसाठी अजूनही दरवाजे खुले- मुख्यमंत्री
हिवाळी अधिवेशनाला डिसेंबरपासून सुरुवात होत असून पुढील आठवड्यात या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे फडणवीसांनी पत्रकारांना सांगितले. तसेच युतीसंदर्भात शिवसेनेशी चर्चा करण्याचे दरवाजे अद्याप खुले आहेत. शिवसेनेशी चर्चा होणे शक्य असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
मात्र शिवसेना आणि भाजपच्या युतीसंदर्भातील बोलणी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतल्याचे वृत्त त्यांनी यावेळी फेटाळून लावले.
