चायना ओपन स्पर्धेचे जेतेपद सायना, श्रीकांतने पटकावले

saina
फुझू – जपानच्या अॅ केन यामागुचीचा भारतीय बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालने अंतिम फेरीत २१-१२, २२-२० पराभव केला. ४२ मिनिटे झुंज देत सायनाने कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेचे जेतेपद पटकवले. सहाव्यांदा या स्पर्धेत सहभागी झालेल्या सायनाला प्रथमच येथे ही स्पर्धा जिंकता आली. यावर्षातील तिचे हे तिसरे जेतेपद ठरले. यावर्षी तिने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रॉँप्री गोल्ड आणि ऑस्ट्रेलियन सुपर सिरीज या दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्यावर्षी एकही जेतेपद जिंकू न शकलेल्या सायनासाठी चीनमधील हे जेतेपद महत्वपूर्ण आहे. त्यातच २०१२ डेन्मार्कमधील जेतेपदानंतर सायना प्रथमच सुपरसिरीज प्रिमियर प्रकारातील स्पर्धा जिंकू शकली आहे.

सायनाप्रमाणे २१ वर्षीय श्रीकांतने पुरुष एकेरीत कमाल केली. सुपरसिरीज प्रिमियर प्रकारात खेळण्याचा फारसा अनुभव नसताना त्याने अंतिम फेरीत पाचवेळा वर्ल्ड चॅँपियन ठरलेला चीनच्या लिन डॅनला नमवले. २१-१९, २१-१७ अशी सलग दोन गेममध्ये श्रीकांतने बाजी मारली.

Leave a Comment