भूकंपाच्या धक्क्याने ह्दरले न्यूझीलंडला

new-zeland
वेलिंग्टन – सोमवारी सकाळी १०. ३३ मिनिटांच्या सुमारास ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का न्यूझीलंडच्या पूर्व किनारपट्टी भागाला बसला.

या भूकंपाचे केंद्रबिंदू न्यूझीलंडमधील गिसबोर्न शहराजवळून २०० किमी अंतरावर आणि ३५ किलोमीटर खोल होते. मात्र यामध्ये कोणतीही जिवित अथवा वित्तहानी झालेली नाही. तसेच त्सुनामीचा कोणताही धोका नाही. यापूर्वी २०११ मध्ये न्यूझीलंडमधील ख्रिस्तचर्च भागाला सुमारे ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. यामध्ये १८५ नागरिक ठार झाले होते.

Leave a Comment