
मुंबई – उच्च न्यायालयात भाजप सरकारच्या आवाजी विश्वासदर्शक ठरावाविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेत बहुमत सिद्ध करण्यावेळी विधानसभा सदस्याची मतदानाची मागणी केल्यास ती घटनेनुसार नाकारता येत नाही, असा दावा राजकुमार अवस्थी यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयात विश्वासदर्शक ठरावाविरोधात याचिका
तसेच ठरावाच्या वेळेची छायचित्रफित, नोंद केलेला तपशीलही सरकारने न्यायालयापुढे सादर करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आल्या त्यामुळे आता भाजपच्या विश्वासमताच्या विरोधात थेट न्यायालयातच याचिका दाखल झाली आहे. यावर आता न्यायालय काय निर्णय घेते हे औतुस्क्याचे ठरणार आहे.
