भारतातील राष्ट्रीय उद्यानांची ओळख – भाग १

jim
जिम कार्बेट अभयारण्य
उत्तराखंड राज्यातील हे अभयारण्य 1936 साली घोषित झाले असून देशातील ते पहिले वहिले अभयारण्य आहे. या उद्यानात प्रामु‘याने बंगाल टायगर, (पट्टेरी वाघ), हिमालयन अस्वले, आळशी किंवा स्लोथ अस्वले आढळतात. हे उद्यान 50 प्रकारचे सस्तन प्राणी, 580 प्रजातीचे पक्षी, 25 सरपटणार्या प्राण्यांच्या प्रजातींना आसरा देत आहेच पण येथे 480 प्रकारची वृक्षसंपदाही आहे. त्यातील 110 प्रजाती मोठ्या वृक्षांच्या आहेत.

वाघ आणि अस्वले येथे खूप प्रमाणात आहेतच पण त्याचबरोबर पाणमांजरे, बार्किंग डिअर ( ही कुत्र्यांसारखी भुंकतात), सांबर, हॉग डिअर, चितळ या हरिणांच्या जाती, मुंगुसे, लंगूर माकडे, पिवळ्या गळ्याची मार्टन्स,हिमालयन गोराल, इंडियन पंगोलिन्स, मांजरांच्या अनेक जाती, रानमांजरे ही पाहायला मिळतात.वाघांप्रमाणेच येथे नामशेष होऊ घातलेल्या स्थानिक सुसरी, मगरींनाही संरक्षण देऊन त्यांची सं‘या वाढविण्याचे प्रयत्न केले जातात.

या अभयारण्यासाठी जंगल सफारी घेता येते आणि जगातील कांही चांगल्या जंगल सफारीत या सफारीचा समावेश होतो. पंतनगर हा येथील जवळचा विमानतळ आहे तर आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली येथे आहे.रामनगर हे पाच मैलावरचे रेल्वे स्टेशन येथे जाण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. लखनौपासून 90 मैलावर तर नैनितालपासून अवघ्या 41 मैलांवर हे अभयारण्य आहे.

अभयारण्याची वेळ साधारणपणे सूर्योदय ते सूर्यास्त अशी असते मात्र सीझनप्रमाणे वेळ बदलते. राहण्यासाठी वनविभागाचे रेस्ट हाऊस हा चांगला पर्याय आहे.

Leave a Comment