ब्रिक्स देशांना काळ्या पैशाबाबत मोदींचे आवाहन

modi
ब्रिस्बेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा परदेशी बँकांमध्ये असलेल्या भारताचा पैसा परत आणणे आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले असून ब्रिक्स देशांनी हा काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केल आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी जी-२० देशांच्या बैठकीआधी विविध देशांच्या नेत्यांची भेट घेतली.

आजपासून ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये जी-२० देशांची बैठक सुरु झाली असून या बैठकीआधी जगातल्या अनेक देशांच्या नेत्यांशी पंतप्रधान मोदींनी भेट घेतली. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी देखील मोदींनी अनौपचापरीक चर्चा केली.

भारतातील काळा पैसा परत आणण्याला आपली प्राथमिकता असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. भारताबाहेर असलेला बेहिशेबी पैसा परत आणणे हे आपल्या सरकारसमोर एक आव्हान असल्यामुळे हा पैसा भारतात परत आणण्यासाठी ब्रिक्स देशांनी सहकार्य करावे असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

Leave a Comment