
दुबई – भारताच्या विराट कोहली आणि शिखर धवन या क्रिकेटपटूंनी आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले असून धोनीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा विराट कोहली या यादीत तिस-या स्थानी तर सलमीवीर शिखर धवन पाचव्या स्थानी आहे.
आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये कोहली, धवन
दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला मुकलेल्या महेंद्रसिंह धोनी सातव्या स्थानी आला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा ए.बी.डीविलियर्स अव्वल तर हाशिम आमला दुस-या स्थानी आहे.
एकदिवसीय गोलंदाजीच्या क्रमवारीत मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि पाकिस्तानचा मोहम्मद हाफीझ संयुक्तरित्या सहाव्या स्थानी आहे तर रविंद्र जडेजा आठव्या स्थानी आहे. आयसीसीच्या एकदिवसीय सांघिक क्रमवारीत भारताने पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे. तर दक्षिण आफ्रिका दुस-या आणि ऑस्ट्रेलिया तिस-या स्थानी आहे.
