माजी उपपंतप्रधान कॉप्स यांची बलात्कार झाल्याची कबुली

sheela
कॅनडाच्या माजी उपपंतप्रधान शीला कॉप्स यांनी त्यांच्यावर दोनवेळा बलात्कारास सामोरे जाण्याची वेळ आल्याचा खळबळजनक खुलासा केल्यानंतर तेथील राजकारण ढवळून निघाले आहे. शीला यांनी त्या राजकारणात नुकत्याच आल्या तेव्हा त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी त्यांच्यावर बलात्कार केल्याचा खुलासा वृत्तपत्रातील रकान्यातून केल्यानंतर या दोन्ही खासदारांना निलंबित करण्यात आले असल्याचेही समजते. या दोन्ही खासदारांवर एका टॉप रेडिओ होस्टवर लैगिक अपराध प्रकरणात गोळीबार केल्याचाही आरोप ठेवला गेला आहे.

शीला कॉप्स यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या २८ व्या वर्षी प्रथम खासदार झाल्या तेव्हाच त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने त्यांच्यावर बळजबरी करून बलात्कार केला होता. शीला १९९३ ते ९७ या काळात कॅनडाच्या उपपंतप्रधान होत्या. त्या सांगतात महिला लैगिक अत्याचार संबंधी त्या एका टूरवर गेल्या होत्या तेव्हाही हॉटेलमध्येच त्यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या दुसर्‍या खासदाराने बलात्कार केला होता. त्याचवेळी त्यांनी पोलिसांत तक्रार न करण्याची मोठी चूक केली असेही त्यांनी मान्य केले आहे.

Leave a Comment