
नवी दिल्ली – रेल्वेच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी रेल्वेने परताव्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. कोणत्याही कारणाने गाडी सुटल्यास संबंधित प्रवाशाला नव्या नियमांनुसार तीन दिवसांच्या आत आपले तिकीट परत करावे लागणार आहे. असे केल्यासच प्रवाशांना तिकिटाचे अर्धे पैसे परत मिळणार असून या कालमर्यादेनंतर रेल्वे पैसे परत करणार नाही.
रेल्वे तिकीट तीन दिवसांत परत केल्यासच मिळणार रिफंड
आतापर्यंत रेल्वे सुटून गेल्यास प्रवासी तीस दिवसांपर्यंत तिकीट परत करू शकत होते. रायपूरच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे परत मिळविण्यासाठी प्रवाशांना तिकीट डिपॉझिट पावती किंवा टीडीआर भरावी लागेल . यासोबतच गाडी सुटण्याचे कारणही स्पष्ट करावयाचे आहे. मात्र, आतापर्यंत या प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी देण्यात आल्याने दलालांचे काम फावत होते आणि रेल्वेला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत होते.
