
मुंबई – महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठरावाच्या अग्निपरिक्षेला सामोरे जात आज दुपारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. यावेळी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
भाजपने जिंकली अग्निपरीक्षा
भाजपने सरकार स्थापन केले असले तरी, त्यांचे सरकार अल्पमतातले आहे. भाजपकडे १२२ आमदार आहेत. विधानसभेत बहुमत सिध्द करण्यासाठी भाजपला १४५ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. शिवसेनेने मतविभाजनाची केलेली मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली.
