सरिता देवीवर होणार कडक कारवाई

sarita-devi
क्वालांलपूर – महिला बॉक्सर सरिता देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत पोडियमवर कांस्यपदक स्विकारण्यास नकार दिल्यामुळे आता तिच्या विरोधात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दक्षिण कोरियाच्या जिना पार्क विरुध्दच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सरिताने पार्क पेक्षा सरस खेळ करुनही पंचांनी सरिता पराभूत असल्याचा निकाल दिला. त्यामुळे संतापलेल्या सरिता देवीने पोडियमवर कांस्यपदक स्विकारण्यास नकार दिला होता. तिच्या या वर्तनाबद्दल तिच्यासह तीन प्रशिक्षकांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. सरितादेवी प्रकरणी समिती लवकरच निर्णय घेईल. तिच्याविरोधात कडक कारवाई केली जाण्याची आशा आहे.

Leave a Comment