
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष जिवा पांडू गावित यांनी येत्या १२ नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या महाराष्ट्र विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभेत केली व त्यासाठीचा कार्यक्रम जाहीर केला.
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक उद्या
१२ नोव्हेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. यासाठी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत नामनिर्देश पत्र प्रधानसचिव विधानमंडळ यांच्या दालनात स्वीकारण्यात येणार असून, यानंतर लगेच आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची वेळ १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत आहे. एका अर्जापेक्षा दोन अर्ज आल्यास १२ ते १ या वेळेदरम्यान मतदान घेण्यात येणार असून, २ वाजता मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असणारच आहे. मात्र, सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या निवडणुकीत काय भूमिका घेते, यावर मतदान होणार की निवडणूक अविरोध होणार हे अवलंबून आहे.
