आता ‘ई’ स्वरुपात बघा पुस्तके

ebook
अहमदाबाद – ‘ई-लायब्ररी रीडर’ या सॉफ्टवेअरद्वारे वाचकांना संगणकावर आणि मोबाइलवर अँड्रॉइड अ‍ॅपद्वारे गुजरातच्या ग्रंथालय संचालकांनी ७० हजार गुजराती पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. आतापर्यंत ७० हजार पुस्तकांची १.९५ कोटी पाने ‘ई-बुक्स’मध्ये रूपांतरित केल्यामुळे ही पुस्तके वाचकांना कधीही वाचता येणार आहेत.

पुस्तकाचे प्रत्येक पान या उपक्रमात स्कॅन केले जाते. त्यानंतर ते पीडीएफमध्ये स्वरुपात आणले जाते. हे पुस्तक केवळ वाचू शकतो. त्याची कॉपी करता येत नाही, असे ग्रंथालय विभागाच्या संचालक डॉ. वर्षा मेहता यांनी सांगितले. सेंट्रल लायब्ररी आणि स्टेट रिपोसिटरी सेंटर या दोन ग्रंथालयातील ही पुस्तके आहेत.

Leave a Comment