अवघ्या ६९९ रूपयांत विमानसेवा

air-asia
दिल्ली : अवघ्या ६९९ रूपयांत सर्वसामान्यांसाठी देशांतर्गत विमानसेवा एअर एशिया या कंपनीने उपलब्ध करून दिली असून केवळ १६ नोव्हेंबरपर्यंतच ही ऑफर असणार आहे.

बंगळुरू येथून चेन्नई, कोची, गोवा, जयपूर आणि चंदीगढ येथे जाणा-या आणि या ठिकाणाहून बंगळूरु येथे येणा-या विमानाचा एक वेळचा प्रवास अवघ्या 699 रूपयात करता येणार आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या या ऑफरसाठी प्रवाशांना २,५९९ रूपये मोजावे लागणार आहेत. ही ऑफर बंगळुरू ते देशाच्या मुख्य शहरांदरम्यान उपलब्ध असून, यात मुंबईचा समावेश नाही. या एका आठवडय़ात प्रवासी विमानाच्या तिकिटाचे १० जून २०१५ ते १७ जानेवारी २०१६ पर्यंतचे आरक्षण करू शकतात.

Leave a Comment