
इस्लामाबाद – मंगळवारी एका प्रवासी बसला पाकिस्तानातील सिंध प्रांतात झालेल्या भीषण अपघातात सुमारे ५० जण मृत्युमुखी पडले असून २० जण जखमी झाले आहे.
पाकिस्तानातील भीषण बस अपघातात ५० जण मृत्युमुखी
स्वात जिल्ह्याहून कराचीच्या दिशेने निघालेली ही बस ८० प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बसने समोरुन येत असलेला ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसमधील ५० प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये आठ महिला आणि मुलांचा समावेश आहे. तर २० जण जखमी झालेत.
या अपघाताप्रकरणी राष्ट्रपती मम्नून हुसैन यांनी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य ते उपचार दिले जावेत असे रुग्णालयांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच सिंध राज्याचे राज्यपाल इशरत इबाद यांनीही यावेळी मृत प्रवाशांच्या नातेवाईंकाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
